Saturday, September 21, 2013

Firefox मध्ये सेव्ह केलेला पासवर्ड कसा शोधाल

आपण जर रोज मेल्स चेक करण्यासाठी स्वतःचाच Laptop किवा Computer वापरत असाल तर
आपण आपले रोज लागणारे Passwords  सेव्ह करून ठेवतोदिवसेंदिवस असे करत असताना
काही Passwords आपण  विसरून जातो आणि कधी तरी जर दुस-या Laptop किवा Computer वर आपल्याला
Log in करायचे असेल तर आपल्याला हे सेव्ह केलेले  Passwords  शोधावे  लागतत. तेव्हा,
तुमचा firefox browser मध्ये सेव्ह केलेला पासवर्ड कसा शोधाल हे आपण पाहूया पुढील स्टेप्स मध्ये
स्टेप्स :
१.      Tools मेनू मध्ये जा.












२.      Option वर क्लिक करा.












३.      Security वर क्लिक करा. हे  कुलुपाच्या खुणेने दाखविलेले असेल.














४.      Saved Password  वर क्लिक करा.













५.      Show Password वर क्लिक करा.





















६.      इथे आलेल्या Instruction  Box  मधील Yes वर करा









. तुमच्या Email ID  Passwords ची यादी दिसेल त्यातील योग्य तो Password शोधा.

Sunday, September 1, 2013

संस्कारांचा कित्ता













आजच्या प्रवाहात ओंडक्यासारखे वाहून चालणार नाही
संस्कारांचा कित्ता आपला तसाच गिरवून भागणार नाही |

नेहमी खरे बोलायचे शिकला असाल  
पण आजच्या जगाला ते पटणार नाही
किरकोळ खोटे तरी बोलायला हवे
त्याशिवाय हक्कच काय पण जीवसुद्धा वाचणार नाही |

आज्ञा पाळणे हेच कर्तव्य मानले असाल  
पण सोबतच्या माणसांनाच आज ते रुचणार नाही
काही आज्ञांना कानी पडूच द्यायचे नसते
असे नाही केले तर तुमचे अस्तित्वही कुणी जाणणार नाही |

'इथे तिथे' न पाहता नाकासमोर चालला असाल
नुसते सरळ चालून हा रस्ता कधी संपणार नाही
ज्याच्या समोर जातोय ते नाकही कधी खुपसावे लागते
त्याशिवाय ज्या गावी जायचेय ते नजरेसही पडणार नाही |

स्वतःलाही विसरून मदत करत हिंडला असाल
म्हणाल असे हिंडताना काटे कधी रुतणार नाही
पण काटा लागेल तेव्हा फक्त स्वतःचीच फुंकर असेल
कुणीच नसेल आजूबाजूस वा असूनही कुणी येणार नाही |

आजच्या प्रवाहात ओंडक्यासारखे वाहून चालणार नाही
संस्कारांचा कित्ता आपला तसाच गिरवून भागणार नाही |

- नम्रता